अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या मंदिरावर आता सौर ऊर्जा प्रकल्प !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील श्री वीरभद्र मंदिर सार्वजनिक देऊळ व उत्सव ट्रस्टला येणाऱ्या वाढत्या वीज बिलांच्या खर्चात कपात व बचत करण्यासाठी राहाता शहरातील ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहेत.

वीजबिल वाढत असल्याने ट्रस्टवर दिवसेंदिवस आर्थिक बार वाढत चालला होता. बिलांच्या खर्चात बचत व्हावी या उद्देशाने ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने यांच्या संकल्पनेतून ट्रस्टने मंदिरावर सौर ऊर्जा पॅनल बसविले आहे.

याचा प्रारंभ निधाने, पुजारी सर्जेराव भगत व माजी अध्यक्ष सागर सदाफळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी देवस्थान विश्वस्त, ग्रामस्थ उपस्थित होते,

याप्रसंगी निधाने म्हणाले की, या वीज निर्मितीमुळे मंदीराची विजेची गरज भागविली जाणार असून यातून वीजेच्या बिलावर होणारा मोठा खर्च वाचणार आहे. शिवाय ही योजना दिर्घकाळ चालणारी असल्याने व सूर्यप्रकाशाचा उपयोग करून कार्यान्वित होत आहे.

सौर ऊर्जेमुळे यापुर्वीच्या तुलनेत विजेच्या खर्चामध्ये मोठी बचत होईल. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे कामकाज प्रगतीपथावर सुरू आहे.

पुढील २५ वर्षे कोणत्याही प्रकारचा देखभालीचा खर्च येणार नाही, तसेच यातून निर्मात होणारी वीज मंदिराची गरज भागवून विद्युत मंडळाला विकता येईल, अशी माहिती हा प्रकल्य कार्यान्वित करणारे संकेत सदाफळ व मोहीत गाढवे यांनी दिली.

याप्रसंगी निवृत्ती बनकर, माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर, प्रविण सदाफळ, सरजेराव मते, अंबादास गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भानुदास बोढे, बाबासाहेब सोनटक्के, चद्रशेखर काले, चंद्रभान मेहेजे, रावसाहेब धुमसे, सतिष बोठे, विजय सदाफळ, सचिव अरविंद गाडेकर, लावर गुरू, विजय जांगिड यांच्यासह ग्रामस्थ, विश्वस्त उपस्थित होते.

श्री वीरभद्र मंदिर ट्रस्टला महिन्याकाठी वीज बिलावर हजारो रुपये खर्च करावे लागतात. दिवसेंदिवस विजेचे बिलसुद्धा वाढत आहे, वीजबिलात बचत करण्यासाठी आम्ही विश्वस्तांनी सर्वानुमते सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आता वीज बिलाच्या खर्चात मोठी कपात व बचत होणार आहे. त्याचा फायदा मंदिराच्या उर्वरित विकास कामांसाठी अथवा भक्तांच्या सोयी सुविधांसाठी करता येईल. – साहेबराव निधाने

Ahmednagarlive24 Office