Ahmednagar News : शहराची विकासकामे करीत असताना या पाच वर्षांमध्ये कोरोनाचे संकट आपल्यावर ओढावले, आणि पाठोपाठ सरकार बदलाबदलीमध्ये फार वेळ गेला आणि विकास कामे करीत असताना अडचणी आल्या. मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती दिली होती. कारण कोविड काळामध्ये निधी उपलब्ध होत नव्हता. हा सर्व निधी आरोग्यासाठी वळविला होता त्यामुळे अनेक कामे ठप्प होती.
परंतु मी सरकारमधला प्रतिनिधी असल्यामुळे शहर विकासाला भरभरून निधी मंजूर करून आणला आहे. आता ती कामे टप्याटप्प्याने सुरू आहेत, विकासाची कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना देखील त्याची प्रचिती येत आहे. परंतु काही लोक आता मी मंजूर केलेल्या कामाची माहिती घेऊन या कामाचे श्रेय मिळावे यासाठी आंदोलने करणार आहेत.अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.
त्यांना माहिती आहे की, आता काम सुरू होणार आहे. त्याचे आपण श्रेय घेऊ, रामचंद्र खुंट ते कोठी चौक हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता मात्र कोविडच्या संकट काळामध्ये निधी उपलब्ध नसताना देखील कै.रसिक कोठारी यांनी या रस्त्याचे दर्जेदार काम करून दिले आहे.
अजून पर्यंत हा रस्ता मंजूर नाही. कोविड काळामध्ये निधी उपलब्ध होत नव्हता. हा सर्व निधी आरोग्यासाठी वळविला होता तरी देखील विकासाची कामे सुरू राहावी यासाठी प्रयत्न केले. रामचंद्र खुंट ते गंज बाजार या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले नाही आता या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंट ते गंज बाजार तपकीर गल्ली येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, भा कुरेशी, दीपक अग्रवाल, कमलेश भंडारी, गुड्डू खताळ, सागर मुर्तडकर, गोपाल चांडक, किसन बंग, हरी किसन बियाणी, शिवकांत हेडा, गणेश बंग, हिनय पटेल, गौतम राका, दुल्लक पटेल, सत्यनारायण झंवर, सुभाष झंवर, मनोज बिहाणी, राजेश हेडा, रामेश्वर लाहोटी, पारस बडजाते, शैलेश जाजू, बाळकृष्ण बंग, पवन बंग, विजय गांधी, सचिन झंवर, तुषार लड्डा, ललिता झंवर, चंदा बंग, सविता बिहानी, राजेंद्र सोनी, सुनील छाजेड, मनीषा हेडा, प्रियंका झंवर, दीपिका बंग आदी उपस्थित होते.