अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- तालुक्यातील ज्या पाणी योजनांचे वीजबिल थकले आहे, अशा गावांत टाईड (बंदिस्त) निधीमधून सोलर सिस्टिम बसवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती काशीनाथ दाते यांनी दिली.
तालुक्यातील एका कार्यक्रमात दाते बोलत होते. दाते पुढे म्हणाले, येथील शाळेतील मुलांसाठी हात धुण्यासाठी हॅंडवॉश देण्यात आले असून, गटातील शाळांसाठी बाके देण्यात आली आहेत.
ज्या पाणी योजनांचे वीजबिल थकले आहे, तेथे टाईड (बंदिस्त)निधीमधून सोलर बसवण्याचा विचार आहे. म्हसोबाझाप येथील विहिरीवर प्रथम सोलर बसविण्यात येईल.
त्यामुळे ग्रामपंचायतवर वीजबिल भरण्याचा बोजा पडणार नाही. या योजनेचा खडकवाडीसह परिसरातील जवळपास सर्वच गावांना लाभ होईल, असेही सभापती दाते म्हणाले.