अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.(Ahmednagar news)
मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करुन देखील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने बेमुदत संप सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान आज नगर शहरातील महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद ठेऊन न्यू आर्टस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले.
नेमक्या काय आहेत मागण्या? जाणून घ्या
राज्यातील अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाची ५८ महिन्याची थकबाकी अदा करावी, अकृषी विद्यापीठातील पदांना सातवा वेतन आयोग लागू करावा,
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दहा-वीस व तीस वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचार्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत,
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द झालेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा सुधारित संरचना लागू करण्यात यावी पाच दिवसाचा आठवडा पदोन्नतीतील कर्मचार्यांचे आरक्षण कॅशलेस मेडिकल सुविधा,
कर्मचार्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षणाची सवलत अनुकंपा भरतीचे नियम शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे.