अहमदनगर बातम्या

आता तर चोरट्यांनी कमालच केली: चक्क तलाठी कार्यालयच फोडले अन…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   चोरट्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांची घरे फोडून दागिने, किमती वस्तू, रोख रक्कम यासह शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची अवजारे आदी वस्तूची चोरी केल्याच्या

घटना आपण ऐकल्या होत्या मात्र आता तर चक्क सरकारी कार्यालयच फोडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.(Ahmednagar Thift)

याबाबत सविस्तर माहिती अशी अज्ञात चोरट्यांनी तलाठी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कार्यालयातील लॅपटॉप व इतर साहित्य असा सुमारे ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील रामपूरवाडी येथे घडली.

या घटनेबाबत तलाठी भारती सावळेराम लोखंडे यांनी राहाता पोलिसात फिर्याददिली आहे. दि. ३१ डिसेंबर दरम्यान रामपूरवाडी येथील गावठाणात असलेल्या

तलाठी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून कार्यालयाच्या कपाटामध्ये ठेवलेला

एचपी कंपनीचा लॅपटॉप तसेच बॅटरी व इतर साहित्य असा सुमारे ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office