आता ‘त्यांची’ केवळ कार्यकर्ते टिकवून ठेवण्‍यासाठी त्‍यांची धडपड!महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारमध्‍ये मुख्‍यमंत्री असताना उध्‍दव ठाकरे मंत्रालयातही जावू शकले नाही. माझे कुटूंब तुमची जबाबदारी म्‍हणत त्‍यांनी स्‍वत:ची निष्‍क्रीयता दाखवून दिली. आता सुध्‍दा बेताल वक्‍तव्‍य करणाऱ्या प्रवक्‍त्‍यांच्‍या भूमिकेमुळे त्‍यांच्‍या पक्षाची वाताहत झाली आहे.

शरद पवारांच्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचीही फारशी वेगळी परिस्थिती नाही. केवळ आता कार्यकर्ते टिकवून ठेवण्‍यासाठी त्‍यांची धडपड असल्‍याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे विखे पाटील यांनी केली.

कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे ते म्‍हणाले की, सर्वात पारदर्शी अशी पध्‍दत तलाठी भरतीसाठी वापरण्‍यात आली,मात्र जाणीवपुर्वक सरकारची बदनामी करण्‍यासाठी बेछूट आरोप केले जात आहेत.आ.रोहीत पवार यांनी केलेले आरोप म्‍हणजे त्‍यांचे नैराष्‍य दाखवून देते.

तुमच्‍यावर सुरु असलेल्‍या ईडी कारवायांमुळे आता काय समोर येईल हे जनतेला पाहायचे आहे. परिक्षांबाबत कोणतीही श्‍वेतपत्रिका काढायला आमची तयारी आहे. मात्र एकदा लवासाची श्‍वेतपत्रिका काढावीच लागेल असा गर्भित इशारा ना.विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला.

मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली मागील नऊ वर्षात देशाने जगामध्‍ये एक स्‍वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे. आज बहुतांश देश आपल्या देशामध्‍ये गुंतवणूकीसाठी इच्‍छुक झाले आहेत. या माध्‍यमातून रोजगाराची उपलब्‍धता देशामध्‍ये निर्माण होत आहे.

अशा सर्व पार्श्‍वभूमीवर २०२४ साली मोदींना पुन्‍हा पंतप्रधान करण्‍यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांना कटीबध्‍द व्‍हावे लागेल त्‍यादृष्‍टीने राज्‍यातील ३६ जिल्‍ह्यामध्‍ये मेळावे संपन्‍न होणार आहे. नगर जिल्‍ह्यातील मेळावा हा ऐतिहासिक व्‍हावा यासाठी सर्व पक्षांच्‍या पदाधिका-यांनी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.