अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- गेल्या वर्षभरापासून रामवाडी परिसरामध्ये असलेले रस्त्याचे काम त्वरित करा. अशी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने
येथील नागरिकांनी आज रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या खड्ड्याच्या वाढदिवस साजरा करून, अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले.
रामवाडी परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वी महानगरपालिकेने डीपी रस्ता बनवण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली होती.
मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने व या ठिकाणी महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा कचरा उचलला नसल्याने या ठिकाणी मोठी रोगराई पसरलेली आहे. सध्या नगर शहरासह जिल्ह्यामध्ये डेंग्यू, मलेरिया यासारखे आजारांना सामोरे जावे लागत आहे.
अशा परिस्थितीमध्ये मनपाने रामवाडी परिसरामध्ये कोणतीही स्वच्छता मोहीम राबवली नाही, या भागांमध्ये अनेक लहान मुलं आजारी पडली आहेत. या सर्व गोष्टी पाहता मनपाने लवकरात लवकर या भागांमध्ये औषध फवारणी मोहीम राबवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
तसेच गेल्या वर्षभरापासून पडलेले खड्डेसुद्धा बुजवले नाही, महापालिका प्रशासनाला वारंवार सांगून देखील सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याने
येथील नागरिकांनी पडलेल्या खड्ड्यांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून अभिनव आंदोलन केले आहे. जर वेळीच लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे.