अहमदनगर बातम्या

खुशखबर ! शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य व्याजदराने उपलब्ध होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- कोरोना तसेच अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हात तोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे. यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कंबर कसली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके व व्हाईस चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनी दिली. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा मंगळवारी झाली.

यात सध्या शेतकर्‍यांना शासनाचे व्याजदर परतावा धोरणानुसार तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहीत मुदतीस केल्यास तीन लाखांपर्यतच्या मर्यादे अल्पमुदत पीक कर्जे शेतकर्‍यांना शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध आहे.

मात्र, तीन लाखांच्या पुढील पिक कर्जे शेतकर्‍यांना बँकेच्या प्रचलित व्याजदर 10 टक्के व्याजदराने उपलब्ध होत होते. शेतकर्‍यांच्या हिताच्यादृष्टीने बँकेने नेहमीच चांगले निर्णय घेतलेले असून

त्याअनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळ सभेत यावर चर्चा होऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तीन ते पाच लाखांपर्यतच्या कर्जाचे व्याज बँकेच्या स्व भांडवलातून देणेचा निर्णय घेतल्याने शेतकर्‍यांना आता पाच लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे.

Ahmednagarlive24 Office