अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- यंदाच्या वर्षातील शेवटच्या शनीअमावास्येच्या दिवशी सुमारे दोन लाख भाविकांनी शनीशिंगणापूर येथे दर्शन घेतले.
यावेळी भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान शनीअमावास्येच्या पार्शवभूमीवर शनिशिंगणापुरात शुक्रवारी रात्री पासून भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती.
प्रवेशद्वार, मंदिरपरिसर, शनिचौथर्याच्या ठिकाणी विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांना प्रसादाचे शनिभक्तांकडून वाटप करण्यात येत होते.
दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पार्किंग व्यवस्था घोडेगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालयात,
मुळा कारखानाच्या काही अंतरावर, नगर औरंगाबाद रोडवरील या ठिकाणी करण्यात आल्याने भाविकांना दुरवरून पायी चालत यावे लागत होते.