पावसाने अचानक दडी मारली आहे. पाऊस गायब होऊन प्रखर ऊन पडत आहे. तसेच आधिमधि आभाळ दाटून येत असल्याने गर्मी प्रचंड वाढली आहे. ऑगस्ट महिन्यातच नागरिकांना ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे.
कमाल तापमानात तब्बल ८ ते १० तर किमान तापमानात ४ ते ६ अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे. २५ ऑगस्टपर्यंत ही हिट राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मान्सूनने दडी मारल्याने तुरळक भागातच पाऊस सुरू आहे. देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३७ अंशांवर गेला आहे. तर महाराष्ट्राचा पारा ३२ ते ३४ अंशांवर गेल्याने ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हीट जाणवत आहे. अशा वेळी पिकांना पाण्याची पाळी द्यावी लागेल, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
विषुववृत्तीय परिक्षेत्रात वाढली हिंदी उष्णता महासागरावरील विषुववृत्तीय परिक्षेत्रात उष्णता वाढली आहे. त्यामुळे २५ ऑगस्टपर्यंत राज्यात कमाल व किमान तापमानात वाढ राहणार आहे. राज्यातील २५ ते २८ जिल्ह्यांत दुपारचे तापमान ३२ ते ३४ अंशांवर जाईल. या प्रकाराला उष्णता संवाहिनी असे शास्त्रीय नाव दिले आहे.
शहर कमाल किमान तफावत
मुंबई ३१.९ २६.५ ५.४
नागपूर ३२.३ २३.७ ८.६
छ. संभाजीनगर ३३ २४ ९
पुणे ३१ २२.२ ८.८
नाशिक ३०.५ २२.१ ८.४
कोल्हापूर २९.६ २२.९ ६.७
सोलापूर ३४.९ २४.६ १०.३
रत्नागिरी ३१.८ २६.२ ५.६
जळगाव ३३.९ २५ ८.९