अहमदनगर बातम्या

अरे देवा : लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या गुरुजीस लुटले!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या एका शिक्षकास लघुशंका करण्यासाठी थांबणे चांगलेच महागात पडले आहे.

कारण राहुरी कृषी विद्यापीठ नजिक नगर-मनमाड महामार्गावर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका प्राथमिक शिक्षकाला मारहाण करून दुचाकीसह पाच हजार रुपयांचा मोबाईल असा एकुण ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

बजरंग तुकाराम बांदल (रा. नवीन प्रेमदान, हडको, सावेडी) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदल नगर-मनमाड महामार्गावरून स्कुटीवर प्रवास करीत असतांना

कृषी विद्यापीठ नजिक रस्त्याच्या बाजूला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी दुचाकी थांबविली. असता पाठीमागून आलेल्या

दुचाकीस्वार दोन अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील एक मोबाइल व (एमएच १६ एआर ९३४) क्रमांकाची स्कुटी पळवुन नेल्याची फिर्याद बांदल यांनी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office