अरे देवा! ‘या’ तालुक्यातील जनावरांना ‘लंपी’चा संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- आधीच अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाली आहेत तर पुरात काही पिके व जनावरे देखील वाहून गेली आहेत.

त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, चितळी, पाडळी, साकेगाव परीसरात पाळीव प्राण्यांना या आजाराची लागण झाली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने याचा फैलाव वेगाने होत आहे. लंपी हा आजार बहुतेक शेळ्यामेंढ्यामध्ये दिसून येतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण, चालू वर्षी पहिल्यांदाच हा आजार खिल्लार जनावरे, दुभत्या गायी व देशी गायींमध्ये आढळून आल्याने पशुपालक धास्तावले आहेत. या आजाराने जनावरांच्या अंगावर गाठी येत असून, त्या संपूर्ण अंगावर पसरतात. त्यामुळे जनावरे अशक्त होणे, सूज येणे; तर दुधाळ जनावरांमध्ये दुधाची कमतरता होऊन जनावरे वैरण खात नाहीत.

काही कालांतराने शरीरावरील आलेले फोड फुटतात व त्याचा अन्य जनावरांमध्ये फैलाव होतो. वेळीच उपचार न केल्यास जनावरे दगावतात. याचा फैलाव हा डास, गोचीड, पाणवठ्यावर एकत्र पाणी पिल्यामुळे वा जनावरांच्या लाळेमधून व हवेतूनही प्रसार होतो.

त्यामुळे जनावरे शेजारी बांधल्यानेही हा रोग अन्य जनावरांना पसरतो. देशी जनावरांबरोबरच खिल्लार जातीच्या जनावरांमध्ये याचा फैलाव वेगाने होत असल्याने देशी गायींचा सांभाळ करणारे व बैलगाडा मालक धास्तावले आहेत.