अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- महापालिकेचा हक्काचा ४४ गुंठ्याचा ओपन स्पेस महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायकाशी हात मिळवणी करून ओपन स्पेसचा रिवाईस प्लॅन तयार करून मंजुरी घेतली आहे व हा भूखंड महापालिका अधिकाऱ्यांने त्या बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला.(AMC News)
या भागातील रहिवाशांच्या हक्काचा ओपन स्पेस असताना या अधिकाऱ्याने महापालिकेच्या हक्काच्या जागेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. या ओपन स्पेसमध्ये मनपाने अधिकृतपणे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.
या ठिकाणी भव्य दिव्य असे सांस्कृतिक भवन उभे आहे. मग आता हा ओपन स्पेस अनधिकृत कसा झाला.असा सवाल नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी उपस्थित केला आहे.
या ठिकाणी नागरिकांच्या हक्काचा ओपन स्पेस असल्यामुळे दहा-पंधरा वर्षापूर्वी मंदिर व सांस्कृतिक भवन उभे आहे.बांधकाम व्यवसायिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रिवाईस प्लॅन मंजूर करून घेतला आहे
त्यामुळे हे बांधकाम व्यवसायिक नागरिकांना धमकावत आहेत, या ठिकाणी उभे असलेले मंदिरे व सांस्कृतिक भवन पाडण्यात येणार आहे या ठिकाणी मोठी दाट लोकवस्ती आहे.
या भागातील नागरिकांच्या हक्काचा ओपन स्पेस आहे, ही मंदिरे पाडल्यास नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील व येथे मोठा अनुचित प्रकार घडू शकतो
तरी मनपाने सदर प्रकरणात तात्काळ लक्ष घालून मनपाच्या व नागरिकांच्या हक्काचा ओपन स्पेस लुबाडला जाऊन देऊ नये जर या भागातील मंदिराचे व सांस्कृतिक भवनाच्या एकाही विटे ला हात लावून देणार नाही जर असे झाले
तर कुठल्याही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिला.