अहमदनगर बातम्या

अरे बापरे! आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसालाच मारहाण ‘या’ ठिकाणी घडली घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- नगर तालुक्यातील कामरगाव येथे सात जणांनी पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली असून, पोलिस आरोपीला पकडण्यास गेले असता तेथे पोलिसाला लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण करण्यात आली आहे.

याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हल्ल्यात जखमी झालेले नगर तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी भरत बाजीराव धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींमध्ये रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले, आत्मशा सावत्या भोसले, सावत्या भोसले, अविनाश ऊर्फ सुरशा भोसले, शेरिना रमेश भोसले व एक अनोळखी (सर्व रा. पिंपळगाव कौंडा, ता.जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे.

जखमी धुमाळ यांना उपचारासाठी शहरातील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. कामरगाव चौकात फरार आरोपी रमेश भोसले याला पकडण्यासाठी नगर तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी भरत धुमाळ गेले होते.

त्यावेळी तेथे असलेल्या सात जणांनी पोलिस कर्मचारी धुमाळ यांना पकडून लाकडी दांडके, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच आरोपींनी धुमाळ यांच्या दुचाकीचेही नुकसान केले आहे. आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office