अहमदनगर बातम्या

अरे देवा…..शेवगाव तालुक्यातील ‘या’परिसराला पावसाचा पुन्हा तडाखा…?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- वीस दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच परत एकदा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले.

या पावसाने खरिपातील कपाशी, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर फरशी ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेवगाव- गेवराई राज्यमार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती.

या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे बालमटाकळी, बोधेगाव, चापडगाव, राक्षी, गदेवाडी, पिंगेवाडी, हसनापूर,

दोन्ही मंगळूर, दोन्ही अंतरवाली, राणेगाव, शिंगोरी, अधोडी, दिवटे, गोळेगाव, नागलवाडी, लाडजळगाव शेकटे, सुकळी, मुरमी, गायकवाडजळगाव, मुंगी, हातगाव, कांबी, खाम- पिंप्री, लखमापुरी, सोनविहीर,

प्रभुवाडगाव, आदी गावांत शनिवारी मध्यरात्री झालेल्या सर्वदूर मुसळधार पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेवगाव गेवराई राज्य मार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प होती.

या पावसाने परिसरातील सर्व बंधारे, पाझरतलाव ओसंडून वाहत असून, सर्वच नद्यांना पूर आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या आशा आता मावळल्या आहेत.

या वातावरणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलून मदत देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Ahmednagarlive24 Office