अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- पत्नीच्या किडनीचे ऑपरेशनसाठी तीन लाख रुपये व्याजाने घेताना सावकाराने गॅरंटी म्हणून बळजबरीने एक एकर जमीनचे खरेदी खत करून नावावर केली.
मात्र ही शेतजमीन परत घेण्यासाठी सावकारास मुद्दल अधिक व्याज मिळून असे तब्बल ६ लाख ६० हजार रुपये देण्यास संबंधित तयार आहे.
मात्र सावकार ही जमीन देण्यास नकार देत असल्याने याप्रकरणी राहाता तालुक्यातील नांदूर येथील शेतकरी शैलेश गायकवाड यांनी श्रीरामपूर येथील भारत हुसेन लोखंडे याच्या विरोधात राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, राहाता तालुक्यातील नांदुर येथील शेतकरी शैलेश माधवराव गायकवाड यांनी सन २०२० मध्ये पत्नीच्या किडनीचे ऑपरेशनसाठी पैशाची गरज होती.
त्या दरम्यानच्या काळात व्याजाने पैसे देणारा व ओळखीचा श्रीरामपूर येथील भारत हुसेन लोखंडे ३ लाख रुपये १० टक्के व्याजाने देतो, असे सांगून व्यवहाराची गॅरंटी म्हणून एक एकर जमिनीचे खरेदीखत करून द्यावे लागेल, असे मला सांगितले.
त्यास व्याजाने घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज परत दिल्यानंतर लगेच तात्काळ माझी जमीन पुन्हा माझ्या नावावर करून द्यावी लागेल, असे ठरले होते.
व्याजाने घेणार असलेली सदरची रक्कम वर्षभरात परत देण्याचे शेतकरी गायकवाड यांनी लोखंडे याला कबूल केले होते. त्यानुसार दि. १४ डिसेंबर २०२० रोजी भारत हुसेन लोखंडे याने राहाता येथील दुय्यम लोखंडे याने मला राहाता येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बोलावून घेतले.
माझ्या नावे ३ लाख रुपयांचा कोरा चेक लिहून चेकवरील रक्कम बँकेतून काढून त्यातील ५० हजार रुपये खरेदीच्या कागदपत्रांचा खर्च म्हणून माझ्याकडून काढून घेतले
व २ लाख ५० हजार रुपये मला दिले व तेथेच मला धमकावून माझ्या नावावरील नांदूर शिवारातील गट नंबर १०१ मधील सामाईक क्षेत्रापैकी ४० गुंठे अर्थात एक एकर जमिनीची खरेदी करून घेतली.
त्यानंतर गायकवाड यांनी त्याला सर्व रक्कम दिली असता लोखंडे याने सदरची रक्कम घेतली नाही. उलट मला दमदाटी व शिवीगाळ करून तुझ्याकडून मी जमीन विकत घेतलेली आहे,
त्यामुळे मी तुला तुझी जमीन परत देणार नाही, तुला काय करायचे ते करून घे, असे म्हणाला. या जमिनीची किमत ३५लाख असून लोखंडे याने ती अवघी ३ लाखात बळकावली आहे. अशा फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.