अरे व्वा! भिंगारकरांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  स्वातंत्र्यानंतर प्रथमच भिंगारकरांना केंद्र सरकारच्या लोकोपयोगी विविध योजनांचा लाभ प्राप्त होणार आहे, अशी घोषणा देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचे वृत्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारीत झाले आहे, अशी माहिती अहमदनगर कॅन्टोंमेंट बोर्डाचे भूतपूर्व व्हाईस प्रिसिडेंट अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांनी दिली.

केंद्र सरकारच्या योजना भिंगारकरांना मिळाव्यात यासाठी गेल्या 50 वर्षांपासून भिंगार काँग्रेसच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता, यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली होती. त्यांची आज फलश्रुती झाली. सर्व काँग्रेसजन या निर्णयाचे स्वागत करत आहोत, असे अ‍ॅड.पिल्ले यांनी यावेळी सांगितले.

देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांना आजतागायत या योजनांचा लाभ प्राप्त झालेला नाही. वास्तविक कॅन्टोंमेंट बोर्ड हे केंद्र सरकारच्या अखारित असूनही केंद्र शासनाच्या लोकाभिमुख विविध योजना लागू झालेल्या नसल्याने कॅन्टोंमेंट हद्दीतील नागरिक या योजनांपासून वंचित राहिले. तशी ही फार मोठी शोकातिका आहे.

कॅन्टोमेंट हद्दीतील नागरिक या प्रवाहापासून दूर होतो, परंतु उशिरा का होईलना केंद्र सरकारला जाग आली आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केंद्र सरकारच्या सर्व योजना कॅन्टोन्मेंटला लागू करणार अशी घोषणा केली. त्यामुळे घरकुल-झोपडपट्टी, आरोग्य, सुशिक्षत बेरोजगार आदि योनांचा लाभ आता भिंगारकरांनाही प्राप्त होणार आहे.

प्रत्यक्षात ही अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी खा.डॉ.सुजय विखे पा. यांनी लक्ष घालावे, असे अ‍ॅड.पिल्ले आणि सहकार्‍यांनी सूचविले आहे. खा.विखे पा. यांना तसे पत्र देऊन त्यांचे लक्षही वेधले आहे, असे सांगून भिंगार काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड.पिल्ले म्हणाले, केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शसनाच्या सर्व योजनां आता भिंगारकरांना प्राप्त व्हाव्यात तशी मागणी भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.

तसे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व ना.शंकरराव गडाख पा., आ.संग्राम जगताप आदिंना पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांना दिली.

या निवेदनावर भिंगार शहर काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड.पिल्ले यांच्यासह प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, माजी जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.साहेबराव चौधरी, महिलाध्यक्षा मार्गारेट जाधव, शहर सरचिटणीस संजय झोडगे, सहचिटणीस संतोष धीवर, कोषाध्यक्ष सुभाष त्रिमुखे, निजाम पठाण, अनिल परदेशी, अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे, विवेक येवले, शेख रिजवान आदिंच्या सह्या आहेत.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24