मोरया प्रतिष्ठानच्या वतीने माधवनगर परिसरात वृक्षरोपण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  नगर-कल्याण रोड येथील माधवनगर परिसरात मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा अ.भा. वारकरी मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी धरम भाऊ, अशोक वाळुंजकर, सुरेश अंधारे, सागर धरम, पप्पू बेरड, शुभम पगारे, धनेश बेनकर, रमाकांत बेनकर, राहुल अंधारे, ऋषी पवार, किशोर नावकर, मयुर काळे आदी प्रतिष्ठानचे युवक उपस्थित होते.

सुरेश अंधारे म्हणाले की, वृक्षरोपणाने पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असून, ही मोहिम यशस्वी करणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.

पै.नाना डोंगरे ग्रामीण भागात नेहमीच सामाजिक उपक्रमासह वृक्षरोपण व व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवित असतात. त्यांचे कार्य युवकांना दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले. पै.नाना डोंगरे यांनी विविध कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावल्यास बदल घडणार आहे.

दुष्काळासह अनेक नैसर्गिक संकटे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने उद्भवत आहे. वृक्षरोपण चळवळीला युवकांनी चालना दिल्यास पर्यावरणाचे प्रश्‍न सुटणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

माधवनगर भागात लावण्यात आलेल्या वृक्ष संवर्धनाची जबाबदारी मोरया प्रतिष्ठानच्या युवकांनी घेतली असून, या परिसरात अजूनही मोठ्या संख्येने झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24