अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनने आर्थिक संकटात सापडलेल्या बोल्हेगाव, गांधीनगर येथील चोभे कॉलनीत शंभर गरजू कुटुंबीयांना साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने जीवनावश्यक अन्न-धान्य व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे, शंकर बोरुडे, सचिव सोमनाथ बोर्हाडे, श्रीपाद वाघमारे, अतुल मिसाळ, दिनेश शिंदे, राजू पंचमुख, मल्हारी वाव्हळ, उमेश क्षिरसागर, नितीन पोता, सुरेखा पवार, राजेश भागवत, भाऊसाहेब कोहकडे, बाळू कसबे, रेखा घाडगे, मनिषा नाईक आदि उपस्थित होते.
कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनला महिला होत आला असून, हाताला काम नसल्याने सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्हाड कोसळली आहे.
या संकट काळात कोणीही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने जीवनावश्यक किराणा, अन्न-धान्य व भाजीपाला साहित्याचे गरजूंना घरपोच वाटप करण्याचे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर चोभे कॉलनीत शंभर गरजू कुटुंबीयांना अन्न-धान्य व भाजीपाला देऊन आधार देण्यात आला असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी सांगितले.