अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने येथील जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार व दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक डॉ.अमोल बागुल यांचे क्रीडा व योग शिक्षणातील अध्यापन ,
आंतरराष्ट्रीय संधी या विषयावर ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.बागूल यांच्या वतीने करण्यात येत आहे.
शनिवार दि. २६ डिसेंबर दुपारी ४वाजता गुगल मीटवर संपन्न होणाऱ्या या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये योगाची ऑलम्पिक मध्ये निवड, क्रीडा व योग अध्यापन, आंतरराष्ट्रीय संधी, कौशल्य व्यवसायातील स्वरूप, यासंबंधी असलेले विविध ॲप्स, वेबसाइट्स व सोशल मीडियातील महत्त्वाच्या लिंक्स याविषयी बागुल मार्गदर्शन करणार आहेत.
तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी या ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी व्हावे तसेच याविषयी काही प्रश्न असल्यास आपण ९५९५ ५४ ५५५५ या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा amolbagul3@gmail.com या जीमेलवर वेबिनारआधी पाठवू शकतात किंवा संपर्क साधू शकता.
हिंदी व इंग्रजी भाषेत हे चर्चासत्र संपन्न होणार असून गुगल मीटसह फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, टेलिग्राफ, टम्बलर,जी मेल या सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवर देखील याविषयी महत्त्वाची माहिती टाकली जाणार आहे.
डॉ.बागुल यांच्या भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, कॅबिनेट शिक्षण मंत्री संजोग धोत्रे,महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्य मंत्री ओम प्रकाश कडू, शिक्षण सचिव वंदना कृष्णा,
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी,शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे,शिक्षणाधिकारी (माध्य.) रामदास हराळ, शिक्षणाधिकारी (प्राथ) शिवाजी शिंदे,आदींचे मार्गदर्शन व शुभेच्छा डॉ.बागूल यांना लाभल्या आहेत