ग्रामपंचायत निवडणुकच्या पार्श्ववभूमीवर ‘हे’ सरकारी कार्यालय सुटीच्या दिवशीही चालू राहणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणुक आयोग यांनी राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्हयातील ७६७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

राखीव जागेवर निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कमी कालावधी राहिला आहे.

या गोष्टीचा विचार करून दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर २०२० या शासकिय सुट्टयांचे दिवशी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे.

या सुट्टयांचे दिवशी सकाळी ११.०० ते ०५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. तरी या सुट्टयांचे दिवशी अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अ.मु.शेख, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24