मोठी बातमी ! रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त खाजगी क्षेत्रातील ‘या’ दोन बड्या बँका 22 जानेवारीला राहणार बंद, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Private Bank Holiday : पाच शतकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे रामलला विराजमान होणार आहेत. प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात उद्या श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच राम भक्त उद्या होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आनंदी आहेत.

सध्या देशातील सर्व भाविक रामभक्तीमध्ये तल्लीन पाहायला मिळत आहेत. प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी देखील सजली आहे. दिवाळीच्या आधीच भारतात दिवाळीसारख वातावरण तयार झालं आहे. दरम्यान राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने देखील उद्या अर्थातच 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश मध्ये देखील उद्या शासकीय सुट्टी राहणार आहे.

देशातील अनेक महत्त्वाच्या संस्थांनी उद्या सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये काही प्रायव्हेट संस्थांचा देखील समावेश होतो. रिलायन्स समूहाने देखील उद्या सुट्टी जाहीर केली आहे. उद्या पब्लिक सेक्टर मधील सर्वच बँका अर्धा दिवसासाठी बंद राहणार आहेत. एवढेच नाही तर आता देशातील काही खाजगी बँकांनी देखील 22 जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी आणि ॲक्सिस बँक या देशातील खाजगी क्षेत्रातील दोन बड्या बँकांनी उद्या 22 जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने सुट्टी जाहीर केली आहे.

मात्र या बँका संपूर्ण देशात बंद राहणार नाहीत. काही मोजक्याच राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनीकंट्रोलला याबाबत माहिती देताना सांगितले की, 22 जानेवारी 2024 रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बँका संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत.

दुसरीकडे अॅक्सिस बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये 22 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस अॅक्सिस बँक बंद राहील. यापूर्वी, वित्त मंत्रालयाने 18 जानेवारी रोजी आपल्या आदेशात म्हटले होते की सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या, वित्तीय संस्था आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB) सार्वजनिक सुट्टीच्या निमित्ताने 22 जानेवारी रोजी अर्धा दिवस बंद राहणार आहेत.