एकाच दिवशी ‘या’ तालुक्यात तीन जणांनी आत्महत्या केली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- जामखेड तालुक्यात तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या आत्महत्या तालुक्यातील घोडेगाव, पाटोदा व खर्डा येथे घडल्या आहेत.

याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या ग्रस्तांची नावे अमोल विश्वनाथ माेरे (वय २५, रा. पाटोदा, ता. जामखेड), दत्तात्रय दगडू अडसूळ (वय ५०, रा. घोडेगाव, ता. जामखेड), सचिन हरिश्चंद्र डुकरे (वय २३, रा. खर्डा, ता. जामखेड) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड शहरातील कर्जत रस्त्यावरील एका विहिरीत अमोल विश्वनाथ मोरे (वय २५, रा. पाटोदा) या तरुणाचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना शुक्रवारी सकाळी नागरिकांना आढळून आला.

तालुक्यातील घोडेगाव येथे दत्तात्रय दगडू अडसूळ (वय ५० रा. घोडेगाव) याचाही मृतदेह विहिरीच्या पाण्यावर आढळून आला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. तिसरी घटना खर्डा येथे घडली.

सचिन हरिश्चंद्र डुकरे (वय २३, रा. खर्डा) याने दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान या तीनही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेलं नाही. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24