अहमदनगर बातम्या

‘या’ दिवशी शिर्डी संस्थानच्या नवीन 17 विश्वस्तांचे मंडळ जाहीर होईल !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या नवीन विश्वस्त मंडळाला अपूर्ण विश्वस्त संख्येमुळे पदभार स्वीकारण्यास औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली होती.

दरम्यान नुकतेच शासनाच्यावतीने शपथपत्र दाखल करण्यात आले असून उर्वरित विश्वस्त नियुक्ती करण्यासाठी अजून वेळ मागीतला आहे.पुढील सुनावणी 17 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आल्याने 17 विश्वस्तांचे मंडळ जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.

श्री साईबाबा विश्वस्त मंडळाच्या पूर्ण विश्वस्त मंडळाला उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाची पदभार स्वीकारण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अधिनियम 2004 व श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट सदस्य समितीचे निवड अधिनियम 2013 नुसार राज्य सरकार संस्थान विश्वस्त यांची निवड करते.

मात्र निवड करतांना या विश्वस्त मंडळात सतरा जणांची विश्वस्त म्हणून निवड करणे गरजेचे आहे.मात्र सध्या महाविकास आघाडी सरकारकडून नूतन विश्वस्त मंडळ नेमले त्यामध्ये सध्याची संख्या ही अपूर्ण आहे व अपूर्ण सदस्य संख्या असतांंना

कामकाज करण्यास परवानगी देणे म्हणजे न्यायालयाचा कसूर ठरेल, म्हणून या नवीन विश्वस्त मंडळाच्या अपू-या संख्या असलेल्या सदस्यांना पदभार स्वीकारण्यास पुढील आदेश येईपर्यंत औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली आहे.

दि.28 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आल्याने पुढील सुनावणीपर्यंत तदर्थ समिती संस्थानचे कामकाज बघणार असल्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी दि.17 नोव्हेंबर 2021 आहे.

Ahmednagarlive24 Office