अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. वाढत्या चोऱ्यांना रोखण्यात कोठेतरी पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
दरम्यान कायद्याची भीती मनात राहिली नसल्याने चोरटे देखील अधिक सक्रिय झाले आहे. यामुळे जिल्ह्यात दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत.
नुकतेच श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री रस्त्यावरील हातवळ येेथे चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विलास बलभीम कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे पुढील तपास करत आहेत.