गावठी कट्ट्यासह एकास अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : सोनई पोलिस ठाण्याअतंर्गत घोडेगाव येथे बेकायदा गावठी कट्टा विक्रीसाठी आणले असता सोनई पोलिसांनी नीलेश ऊर्फ निलकंठ मधूकर केदार (रा. घोडेगाव) यास अटक केली.

घोडेगाव येथ ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी आरोपी विनापरवाना गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली सोनई पोलिसांना मिळाली.

त्यानुसार सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे, थोरात यांच्यासह खासगी वाहनाने घटनास्थळी गेले असता आरोपी पळून जाऊ लागला.

परंतु पोलिसांनी पाठलाग करून केदार यास जेरबंद करून सोनई पोलिस ठाण्यात आणले व चौकशी केली. मागील आठवड्यात सोनईजवळ खेडले परमानंद येथे देखील नगर गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना अटक केली.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधीक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोनवणे, ज्ञानेश्वर थोरात, बाबा वाघमोडे यांनी केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24