अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच सुपे टोलनाक्याजवळ संशयास्पद अपघातात एकाचा मृत्यू झाला.
अन्य एकजण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावर ही घटना घडली. भरधाव वेगाने रस्त्याच्या विरूद्ध दिशने येऊन दुचाकीस चिरडून हे चारचाकी वाहन पसार झाल्याने हा अपघात की घातपात याविषयी शंका उपस्थित होत आहे.
सुपे पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार किशोर तुकाराम बर्डे (वय ३५, पदमपूरवाडी, दरेवाडी, नगर), आंतुश चव्हाण (न्हावरा, शिरूर, जि. पुणे) यांच्या दुचाकीवरून (एमएच १२ एमडी ६००२) सुप्याहून पुण्याच्या दिशने जात होते.
चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीस चिरडले. नंतर ते वाहन पसार झाले. या दुर्घटनेत आंतुश चव्हाण जागीच ठार झाले, तर किशोर बर्डे गंभीर जखमी झाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved