ट्रकने धडक दिल्याने मेंढपाळाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात ट्रकने हजारवाडी येथील सायकलस्वार बाळू संभाजी हजारे (वय ५०) यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला. शनिवारी (दि. ८) दुपारी ही घटना घडली.

याबाबत मयताचे बंधू चिमाजी हजारे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माळेवाडी शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या चारी क्र. ७ जवळील रस्त्यावरून मी माझ्या व भाऊ बाळू सबाजी हजारे हा त्याच्या सायकलवरून माळेवाडी गावाकडे मेंढ्यांना चारा पाहण्यासाठी चाललो होतो.

यावेळी आश्वी खुर्दकडे वेगाने एक मालट्रक (क्र. एमएच १५ सीके ८१९१) चालला होता. या ट्रकने बाळू हजारे यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे बाळू हा सायकलसह रस्त्याच्या खाली पडला.

मी माझी सायकल उभी करून जखमी भावाला उचलले व शेजारील नागरिकांच्या मदतीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

परंतु, तेथील डॉक्टरांनी बाळूचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ट्रक चालकाला नाव विचारले, परंतु, त्याने सांगितले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून आश्वी पोलिसांत अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध् गु. र. नं. १९/२०२० प्रमाणे भा. दं. वि. कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24