आर्थिक वर्षांचा अखेरचा सूर्यास्त होत असताना शुक्रवरी (दि.३१ मार्च) जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेला १५० कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात जिल्हा महसूल प्रशासनास यश आले आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या दिशानिर्देशात आणि अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या संचालनात महसूल वसुलीची मोहीम टीम महसूलने अखेर फत्ते झाली आहे.
यावर्षी जिल्ह्यासाठी महसुलाचा इष्टांक हा तब्बल १५० कोटी ४१ लाख रुपये निश्चित करण्यात आला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सूचना वटहुकूम जानेवारी महिन्यापासून वार्षिक महसूल वसुली उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती.
शासनाकडून वर्ष २०२२-२३ साठी जिल्ह्याकरिता निश्चित इष्टांकात जमीन महसूल अंतर्गत ५५ कोटी २९ लाख रुपयांचा तर गौण खनिज वसुलीसाठी ९५ कोटी १२ लाख रुपयांचे उद्दोष्ट देण्यात आले होते. त्यात वाळू लिलाव, अवैध वाळू उपसावर होणारी कारवाई, दंड वाचा समावेश आहे.
शिक्षण, वाढीव कर, रोजगार हमी, अकूषिक, अनधिकृत टॉवर, बिगरशेती करणे, नजराणा भरणे, दंड, जमीन महसूल, शिक्षण कर, वाढीव जमीन यासह गौण खनिज आदीचा यात समावेश आहे. महसूल विभागातून राज्य शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो.
मागील वर्षी राज्य शासनाने जिल्ह्यासाठी २१० कोटींचे उद्दिष्ट्य दिले होते. त्यापैकी ९३ टक्के वसूल झाला होता. यावर्षीच्या उद्दिष्टात गौण खनिजचा इष्टांक घटला. त्यामुळे जिल्ह्यासाठीचे एकुण महसूल उद्दिष्ट्य दीडशे कोटी होते.
मागील आठवडाभारापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या तहसीलदार तथा चिटणीस यांचे विभागाचा तहसील स्तरावर सतत समन्वय संपर्क सुरु होता. जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महसूल प्रशासनातील प्रांताधिकारी,
तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडलाधिकारी, महसूल सहायक, तलाठी आणि कोतवाल मडळींसह जिल्हा खनिकर्म अधिकारी वसिम सय्यद यांच्या टीम मधील अधिकारी ब कर्मचार्यांनी परिश्रमपूर्वक बजावलेल्या कर्तव्यामुळे हे यश मिळाले.