अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निकालात घसरण झाली असून, तब्बल 490 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर, अवघ्या 21 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
हा निकाल हा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा आहे. यंदा ऑगस्ट महिन्यांत शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती. यात पूर्वी माध्यमिक शाळेतून 16 हजार 960 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती.
यातून 15 हजार 176 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 1 हजार 784 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. यात 1 हजार 735 विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले असून,
13 हजार 441 विद्यार्थी अपात्र झाले आहेत दरम्यान या परीक्षेत 490 शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागलेला आहे. यात सर्वाधिक शाळा अकोले आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी 64 आहे.
21 शाळांचा निकाल हा शंभर टक्के आहे. यात सर्वाधिक शाळा कोपरगाव तालुक्यातील आहेत. नगर, श्रीगोंदा, राहुरी, राहाता, नेवासा अणि पारनेर तालुक्यातील एकाही शाळेचा निकाल हा शंभर टक्के नाही.