ट्रकच्या धडकेत एक जण जखमी; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने एक जण जखमी झाला आहे. दरम्यान हा अपघात नगर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल इंद्रायणी समोर घडला आहे.

या अपघातात अशोक बाबासाहेब ढाकणे (वय 37, रा. जोरापूर, ता. शेवगाव) हे जखमी झाले आहे. दरम्यान सदर अपघाताची घटना 23 जानेवारी रोजी घडली असून याप्रकरणी 28 जानेवारीला भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अज्ञात चालक हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एम. एच. २० ए. ए. ७२३२) घेवून जात असताना फिर्यादी अशोक ढाकणे याला धडक बसल्याने ते जखमी झाले. फिर्यादी हे ट्रक्टरचे पंक्चर झालेले चाक वाढत होते. पुढील तपास पो. हे. कॉ. गोरडे हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24