एक किलो कांदा @ १०० रुपये !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-पारनेर येथील बाजार समितीत बुधवारी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीचा कांदा शंभर रूपये किलो दराने विकला गेला. सरासरी ५० ते ८५ रूपये किलो दराने उर्वरित कांद्याची विक्री झाली.

१३ हजार ४०० गोण्यांची आवक झाली. पावसामुळे नवा कांदा खराब झाल्याने सध्या साठवणूक केलेल्या जुन्या कांद्यावरच भिस्त असून व्यापाऱ्यांकडून चांगल्या प्रतीच्या कांद्याला मोठी मागणी असल्याचे सांगण्यात आले.

चांगल्या प्रतीचा कांदा शंभर रूपये किलोने व्यापाऱ्यांनी खरेदी केला. साठवणूक केलेला असल्याने प्रतवारीनुसार कांद्याचे भाव ठरले. ५० ते ८५ रूपये किलो दराने दुय्यम दर्जाच्या कांद्याची विक्री झाली.

फार काळ टिकू न शकणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या दर्जाचा कांदा २० पासून ३५ रूपये किलो होता. शेतातील लाल कांद्याचे पावसाने नुकसान झाले आहे.

बियाणे टाकून तयार करण्यात आलेली रोपे पाण्यात सडून गेल्याने येत्या काही दिवसांत कांद्याचे नवे पीक येणार नाही. नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर कांद्याच्या बियाण्याचे भावही गगनाला भिडले असून महागडे बियाणे खरेदी करून

त्यातून रोप निर्मिती केल्यानंतरच आता कांद्याची लागवड होणार आहे. मार्च महिन्यापर्यंत भावात चांगलीच तेजी राहील असा अंदाज तालुक्यातील व्यापारी वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24