अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- तालुक्यातील चिंभळा हंगेवाडी रोडवर दोन दुचाकीची धडक झाल्याने अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एक जणाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा हंगेवाडी रोडवर हंगेवाडी गावचे शिवारात सायंकाळी 7 चे सुमारास रायकर
यांचे द्राक्षेच्या बागेसमोर आरोपी मच्छीद्र विश्वनाथ ढगे (रा. पिंपळगाव वाघा, ता..नगर) या इसमाने त्याचे ताब्यातील लीओ कंपनीची मोटारसायकल एम.एच.16 सी.पी.5616 यावरून अविचाराने बसवून
हायगयीने जोरात मोटारसायकल चालवुन समोरुन येणारी हीरो होंडा स्प्लेंडर एम.एच 16 बी.डब्लु.1887 ला धडक दिली. त्यात राजेंद्र
उर्फ राजु शामराव गायकवाड (वय-38 रा. चिभळा ता. श्रीगोंदा) हे जागीच ठार झाले असून तर दुसर्या दुचाकीवर बसलेला एक इस किरकोळ जखमी झाला असून त्याचेवर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved