भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेले सुरेश परशराम पाडेकर (वय ४५) हे सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास दूध घालण्यासाठी

जवळके येथे सायकलवरून जात असताना धोंडेवाडी समोरून येणाऱ्या व वावीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंदाई क्रेटा (एमएच १७ बीएक्स ७२११) या कारने जोराची धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाले.

या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24