विचित्र अपघातात एक ठार अन्य गंभीर जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अपघातांचे सत्रच सुरूच असून नुकतेच शनिवारी झालेल्या अनेक विचित्र अपघातात एका जणाला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. दरम्यान हि घटना पारनेर तालुक्यातील भाळवणी मध्ये घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बेल्हा पाडळी येथील शेतकर्‍याचा उसाने भरलेला ट्रॅक्टर भाळवणीच्या दिशेने येत असताना खडीने भरलेला डंपर पाठीमागून भाळवणीकडेच येत होता तर पिकअप टेम्पो कल्याणच्या दिशेने जात होता.

ट्रॅक्टर पुढे चाललेला असताना समोरून पिकअप टेम्पो येत होता. त्याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून खडीने भरलेला डंपर भरधाव वेगात येत होता.

यावेळी डंपर समोर चाललेला उसाचा ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात न आल्याने जोराची धडक होऊन ट्रॅक्टरचे ट्रॉलीसह चार तुकडे होऊन साईडच्या गटारात जाऊन पडले.

तर दुसरीकडे डंपर विरुद्ध दिशेने रोडच्या बाजूला पलटी झाला. या वाहनांच्यामध्ये पिकअप टेम्पो आल्याने पिकअपची चालकाच्या पाठीमागील बाजू पूर्णपणे चिरली गेली. यावेळी एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला या जखमींना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24