डंपर व दुचाकी धडकेत एक जण ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  नगर मनमाड महामार्गावरील अपना हॉटेलसमोर दुचाकीस डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील चालकाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, नगर मनमाड महामार्गावरील अपना हॉटेलसमोर कोपरगावहून नाटेगावाकडे जाणाऱ्या दुचाकीस डंपरने धडक दिल्याने बाबुराव किसन मोरे रा. नाटेगाव ता. कोपरगाव हे गंभीर जखमी झाले.

त्याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. डंपर चालक हा मात्र फरार झाला आहे. याबाबत मयत बाबुराव मोरे यांचा मुलगा पंकज बाबुराव मोरे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातानंतर डंपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभा केला आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.पी. पुंड अधिक तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24