धक्कादायक : रेल्वेच्या धडकेत एक जण ठार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- नगर शहरालगत निंबळक रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळावर असताना भगवान गोरख होळकर, (वय ४२ रा. निंबळक, ता.नगर) यांना रेल्वेने उडवून दिल्याने ते गंभीर जखमी झाले.

जखमी भगवान होळकर यांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते, तेथे त्यांचा मृत्यु झाला. डॉ. बंगाळ यांच्या खबरीवरून

एमआयडीसी पोलिसात अकम्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन भगवान होळकर यांचा नेमका रेल्वेच्या धडकेत कसा मृत्यू झाला? याचा पुढील तपास हेकॉ शेख करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24