Ahmednagar Rape News : एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, दुसर्याने ब्लॅकमेलिंग केलं आणि वारंवार लैंगिक अत्याचार… अखेर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Rape News :  एकाने प्रेमाचा जाळ्यात ओढून तर दुसऱ्याने ब्लॅकमेलिंग करून एका अल्पवयीन युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना येथे नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या दोघांसह कॅफे चालक व लॉज चालक, अशा पाच जणांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगतच्या एका गावाजवळ राहणारी अल्पवयीन मुलगी येथील एका महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. तीन वर्षांपूर्वी तिचे कुटुंबीय शहरातील एका रोड समोर राहत होते.

त्यानंतर त्यांनी दुसरीकडे स्वतःचे घर बांधले. या घराजवळ राहत असलेल्या आशिष राऊत या युवकासोबत तिची ओळख झाली. आशिष याने नंतर या युवती सोबत आणखी ओळख वाढवली. महाविद्यालय सुटल्यानंतर त्याने तिचा पाठलाग सुरू केला.

दोन महिन्यानंतर या मुलीला अडवून माझे तुझ्यासोबत प्रेम आहे, असे सांगितले. काही दिवसानंतर या युवतीने त्याला होकार दिला. एप्रिल २०२३ मध्ये आशिष याने तिला शहरातील अकोले बायपास जवळ असलेल्या एका कॅफेमध्ये नेवुन तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर त्याचा मित्र सागर मालुंजकर यांच्या शहरातील एका मॉल्स मधील गाळ्यात अत्याचार केला. आशिष याने आपला मित्र किरण सोपान राऊत याला या युवतीसोबत असलेल्या नाजूक संबंधाची माहिती दिली

किरण राऊत याने या संधीचा गैरफायदा घेऊन सदर अल्पवयीन युवतीला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. आशिष याच्याबाबत असलेल्या संबंधाबाबत तुझ्या वडिलांना सांगेल, अशी धमकी त्याने दिली. यानंतर किरण याने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला.

एप्रिल ते २१ ऑगस्ट दरम्यान, आशिष राऊत व किरण सोपान राऊत यांनी या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिला फुस लावुन संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठलकडा, कन्हे घाट, अशा विविध ठिकाणी नेवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच सागर मालुंजकर, कॅफे मालक व लॉज मालक या दोघांनी अशिष व किरण यांना मदत केली आहे.

या अत्याचारीत युवतीने काल बुधवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आशिष राऊत, किरण सोपान राऊत (रा. मालुंजकर वस्ती, राऊत मळा, घुलेवाडी), सागर मालुंजकर (रा. घुलेवाडी) यांच्यासह कॅफे मालक व लॉज चालक यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.