अहमदनगर : शिवीगाळ का केली म्हणून विचारणा केली असता एकास बेदम मारहाण करण्यात आली. एमआयडीसीतील सूरज दाळमील येथे ९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.
सुधीरकुमार इश्वर पासवाल (हल्ली रा. एमआयडीसी) यांनी फिर्याद दाखल केली. छोटेलाल माझी, सूरज माझी, भागिरथ माझी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मागील भांडणाच्या कारणावरुन या तिघांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली.