Ahmednagar News : एक तर आमच्या घेतलेल्या जमिनीचा व्याजासह मोबदला द्या; अन्यथा आमची जमीन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : एक तर आमच्या घेतलेल्या जमिनीचा व्याजासह मोबदला द्या; अन्यथा आमची जमीन आम्हाला परत द्या, या मागणीसाठी कोपरगाव तालुका सकल आंबेडकरी मागासवर्गीय भूमिहीन शेतकरी प्रकल्पग्रस्त यांनी तहसील कार्यालयाबाहेर धरणे काल बुधवारी (दि.२०) सकाळी ११ वाजेपासून आंदोलन सुरू केले आहे.

परिसरातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर, दुग्धव्यवसाय आणि पशुपालन या उद्देशाने तत्कालीन शासनाने कोपरगाव शिवार येथील निजाम काळापासून महार वतनाची इनाम वर्ग ६ ब जमीन सर्व्हे नं.नं. ४३ क्षेत्र ११ हे. ९२ आर व सर्व्हे नं. ४४ मध्ये ८ हे. ९३ आर ही ताब्यात घेतली.

याचा सुमारे १६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जमीन अधिग्रहण करताना सरकारने १९४५ ते १९४८ मध्ये दोन ते तीन वर्षेकरिता ७/१२ ताबे गहाण अशा प्रकाराचा शेरा व इतर अधिकारामध्ये कुळ म्हणून डेअरी अॅण्ड कॅटल बिल्डींग फार्म हाऊस अशा प्रकाराचे शेरे ७/१२ उताऱ्यावर लिहिले गेले.

महारावतानाच्या जमीनीला ३२ ग प्रमाणे कुळ कायदा म्हणुन लागत नाही. हे शासकीय अधिकाऱ्यांना अवगत असून देखील डेरी अॅण्ड कॅटल बिल्डींग फार्म हाऊस, असे नाव इतर हक्कात कुळ म्हणुन दाखल केले.

दलित समाजाच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करुन फसवणूक केलेली आहे. तसेच शासनाने डेअरी अॅण्ड कॅटल बिल्डींग फार्म हाउसाठी मागासवर्गीय शेतकऱ्यांची ५२ एकर जमीन संपादन केली. परंतु ज्या प्रयोजनासाठी जमीन संपादन झाली.

तो उद्देश शासनाकडुन दिशाहीन झाला व तो प्रोजेक्ट शासनाचा तेथे आज रोजी तिथे राहिलेला नाही वेगवेगळ्या प्रकाराचे नावे देवून जमीन ताब्यात ठेवली आहे. ज्या प्रयोजनासाठी शासनाने संपादीत केली होती. तो उद्देश रहिला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदर जमिनी मूळ मालकाला परत देण्यात याव्यात.

अशा मागण्या आंदोलनकांनी केलेल्या आहेत. या गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, लाभ मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकाजवळ न्याय मागितला. लढत ७५ वर्षे झाली. संघर्ष सुरू आहे. सरकार दरबारी अर्ज केले; परंतु अद्याप न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता धरणे आंदोलन सुरू केले आहे, असे आंदोलकांनी सांगितले.