मोटारसायकलच्या धडकेत एक जण ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-राहुरी शहरातील नगर-मनमाड रोडवर जुन्या बसस्थानकाच्या चौकात मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाला आहे.

या अपघातात नानासाहेब नारायण गाडे (वय ३८ वर्ष, बारागाव नांदूर) याचा दुर्दैवी मृत्यु आला आहे. तर दुचाकीवर मागे बसलेले सुंदरबाप्पू सावळीराम गाडे (वय ४८) हे जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी खुर्द येथून चोपडे नामक युवक मोटारसायकलवर येत असताना नानासाहेब गाडे व चोपडे यांच्या मोटरसायकलची समोरासमोर जोराची धडक होऊन

यामध्ये दुपारी चार वाजता गाडे जागेवर मयत झाला. रात्री उशिरा गाडे याच्यावर बारागाव नांदूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24