अहमदनगर बातम्या

निरपेक्ष भावनेने सर्वांशी प्रेम करत जावे -माता सुदीक्षाजी महाराज

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- निराकार प्रभुला साक्षी मानून सर्वांभुती प्रेमभावाचा अंगीकार करावा. ‘प्रेम’ केवळ शद्बापर्यंत सिमित राहू नये. ते आपल्या जीवनात आणि व्यवहारात उतरावे.

जर आम्हाला प्रेम आणि आदर यांच्या बदल्यात प्रेम व आदर मिळत नसेल तर तरीही आपण आपले हृदय विशाल करुन सर्वांच्या प्रति प्रेमाचीच भावना धारण करायची आहे,

असे मौलिक विचार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षानिमित्त व्हर्च्युअल रुपात आयोजित केलेल्या विशेष सत्संग समारोहामध्ये व्यक्त केले.

तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचा लाभ संत निरंकारी मिशनच्या वेबसाईटद्वारे नगर शहर व जिल्ह्यातील हजारो अनुयायींनी घेतला.

सद्गुरु माताजींनी समस्त निरंकारी भक्तगणांना आवाहन केले की, क्षणोक्षणी निराकार प्रभुला हृदयामध्ये धारण करुन आपण आपले हृदय इतके पवित्र करावे, की त्यातून केवळ प्रेम आणि प्रेमच उपजेल, वैर, ईर्षा, निंदा, द्वेष यासारख्या नकारात्मक भावनांना त्यामध्ये स्थानच उरु नये.

सर्वांनी निराकार प्रभुचा आधार घेऊन हृदयामध्ये परोपकाराची भावना बाळगावी आणि मर्यादापूर्ण जीवन जगून समस्त मानवजातीला प्रेम वाटत जावे.

यावेळी महाराष्ट्राचा 55 वा प्रादेशिक निरंकारी संत समागम 11,12 व 13 फेब्रुवारी 2022 रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा या नववर्ष सत्संग समारोहामध्ये करण्यात आली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office