अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे गुन्हेगार अमोल कर्डीले याने जयवंत मंजाबा नरवडे (वय ५५ रा. कुरुंद) यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला केला.
या हल्ल्यात नरवडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि,
कुरुंद ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गुन्हेगार अमोल कर्डीले याचा चुलता अनिल कर्डीले याचा पॅनल होता. कर्डीले याच्या पॅनेलने निवडणुकीत निसटते बहुमत मिळविले.
निवडणूक निकालानंतर अमोल कर्डीले याने अनिल कर्डीले याच्यासह चार ते पाच लोकांना घेऊन जयवंत नरवडे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात नरवडे हे गंभीर जखमी झाले.
नरवडे यांना त्यांच्या मुलाने शिरूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर पारनेर पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
गुन्हेगारी वृत्तीचा अमोल कर्डीले… गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पारनेर पोलिसांनी अमोल यास प्रतिबंधात्मक नोटीस बजावून कुरुंद सोडून जाण्याची ताकीद दिली होती.
मात्र अमोल हा कुरुंद येथेच लपून छपून वास्तव्यास होता. प्रचारादरम्यान पोलिस वाहन कुरुंद येथे आले असता अमोल तेथून पसार झाला होता.