अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- नगरमधील कल्याण रोड बायपासजवळील एका पेट्रोल पंपाजवळ गाडीवर ड्रायव्हरचे काम करणार्या रामदास बन्सी पंडीत (रा.निंबळक, ता.नगर) याची गळा चिरुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
पंडित खासगी चालक म्हणून काम करत होते. हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रामदास पंडित हे केडगाव येथे चालक म्हणून कामाला आहेत.
बुधवारी रात्री त्यांनी केडगाव येथून घरी येत असल्याची माहिती फोन करून घरच्यांना दिली होती. यानंतर रामदास घरी आले नाही व त्यांचा फोन बंद येत होता.
त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. गुरुवारी सकाळी रामदास पंडित यांचा मृतदेह कल्याण बायपासजवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खूणा आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved