अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेच्या पोलिसांनी खंडाली (ता. माळसिरस जि. सोलापूर) येथे जेरबंद केले आहे.
मारूती बाबुराव खुळे (वय-२४ रा. खंडाली ता. माळसिरस जि. सोलापूर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. खुळे याने ६ मार्च२०१८ मध्ये कोपरगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवुन नेले होते.
याबाबत पिडीत मुलीच्या घरच्यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पुढे हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधकडे वर्ग करण्यात आला.
आरोपी खुळे व अल्पवयीन मुलगी खंडाली (ता. माळसिरस जि. सोलापूर) येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरूण परदेशी यांना माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांबळे, पोलीस नाईक मोनाली घुटे, रूपाली लोहाळे यांच्या पथकाने खंडाली येथे जावून आरोपीला जेरबंद करून, पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली.