कांद्याचा रिव्हर्स गिअर ; ‘इतके’ भाव घसरले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले. २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा ७० रुपये किलोपर्यंत पोहचला. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.

अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाले. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांदा शंभरी गाठणार असल्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी वर्तवली असतानाच नेवाशात कांद्याने पुन्हा रिव्हर्स गिअर टाकला आहे.

नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात आज कांद्याच्या भावात दोन हजाराची घसरण होवून चार ते पाच हजार क्विटंलचा सर्वसाधारण भाव निघाला. दोनच दिवसाने भाव दोन हजाराने व आज लगेच पुन्हा दोन हजाराने भाव घसरले आहे.

मोजक्या गोण्यास सहा ते साडेसहा हजाराचा भाव मिळाला.मोठ्या कांद्यास चार ते साडेपाच हजार, मध्यम कांद्यास चार हजार तर हलक्या कांद्यास पाचशे ते एक हजार भाव मिळाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24