अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी कांद्याची साठेबाजी ? ; नागरिकांची कारवाईची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले. २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा ७० रुपये किलोपर्यंत पोहचला. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.

अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाले. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांदा शंभरी गाठणार असल्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी वर्तवली. याच पार्श्वभूमीवर देशांतर्गत कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी कांदा साठवणुकीवरही नियंत्रयण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीकडून कांद्या आवक, विक्री आणि शिल्लक साठा याबाबतचा दैनंदिन अहवाल मागविण्यात येऊन कांद्या साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले. मात्र नगर जिल्ह्यात नगर शहर, राहुरी, घोडेगाव आणि अन्य ठिकाणी व्यापार्‍यांनी कमी भावात शेतकर्‍यांकडून कांदा घेवून त्याची साठवणूक करून ठेवली असून

भाव वधारल्यानंतर चढ्या दरात कांदा विक्री सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापार्‍यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. यात या व्यापार्‍यांचे मागील पाच वर्षापूर्वीच्या व्यवहाराच्या तपशीलाचे कागदपत्रे तसेच कांद्याची असलेली साठवणूक तपासली असल्याची माहिती पडताळण्यात आली.

देशभरात कांद्याचा साठा संपूष्टात आला आहे.त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापार्‍यांकडून अतिरिक्त साठा केला आहे की काय, याची पडताळणी नाशिक जिल्ह्यात करण्यात आली. परंतु हीच कारवाई नगर जिल्ह्यात आवश्यक असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत बाजार समित्यामध्ये कांदा आवकमध्ये व्यापार्‍यांनी विकत घेतलेला कांदा आणि त्यानंतर जिल्ह्या बाहेर केलेली विक्री याची तपासणी आवश्यक आहे.

यासह व्यापार्‍यांची असणारी गोदामे याची तपासणी करून त्याठिकाणी कोणत्या शेतकर्‍यांकडून किती कांदा विकत घेतला, याच्या तपशीलाची पडताळी होणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24