महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्‍पधा आयोजित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- उखाणा घेणे हा महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक महिलेच्‍या जीवनातील जिल्‍हवाळ्याचा व आवडीचा विषय आहे. असे म्‍हटलं तर वावग ठरणार नाही. याच गोष्‍टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्‍या सध्‍याच्‍या निराशामय काळात महीलांचा उत्‍साह वाढविण्‍यासाठी गौरी गणपती आणि येणारी नवरात्र या पाश्र्र्वभुमीवर राज्‍यातील महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ऑनलाईन उखाणे स्‍पधा आयोजित करण्‍यात येत आहे.

सदर स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असुन ती निशुल्‍क आहे. ज्‍या महिलांना या स्‍पर्धेत भाग घ्‍यायचा आहे त्‍यांनी नाविन्‍यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मुल्‍य असणारे यापैकी एका उखाण्‍याचा कमीत-कमी दीड ते जास्‍तीत-जास्‍त तीन मिनिटांच्‍या कालावधीचा व्हिडीओ तयार करुन माविमच्‍या जिल्‍हा कार्यालयाकडे ahmednagar.mavim@gmail.com या मेलवर दि. 10 सप्‍टेंबर 2020 पर्यंत पाठवा.

उखाणे निवडीचे निकष -: उखाणे नाविन्‍यपूर्ण असावेत. त्‍यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्‍मक असावा. उखाणे हा मौखिक साहित्यिक असावा. तरी सदर स्‍पर्धेसाठी त्‍यातील आशय हा प्रागतिक विचाराने पूढे नेणारा असावा. आपण सर्व साधारणपणे आपल्‍या यजमानांच्‍या नावाभोवती उखाणे गुंफत असतो, पण या स्‍पर्धेत आपणाला उखाणे समाजसुधारक, ऐतिहासिक व्‍यक्तिरेखा (विशेषतः स्‍त्री व्‍यक्‍ती रेखा), कोविड काळातील अत्‍यावश्‍यक सेवा यांच्‍यापैकी अथवा यासारखे तत्‍सम याचभोवती गुंफणे आवश्‍यक आहे.

उखाणा स्‍त्री-पुरूष समानता या मुल्‍यांचा पुरस्‍कार करणारा असावा. उखाणा कमीत-कमी दिड ते जास्‍तीत-जास्‍त तीन मिनिट लांब असावा. उखाणा मुखोदगत / पाठ असावा. जिल्‍ह्यात प्राप्‍त उखाण्‍याची जिल्‍हा स्‍तरावर परीक्षकाकडुन छाननी करून त्‍यापैकी पात्र माविमच्‍या 03 क्रमांक व माविमेतर महिलांचे 03 क्रमांक काढून 06 व्हिडीओ विभागीय स्‍तरावर पाठविण्‍यात येतील. प्रती जिल्‍हा 06 याप्रमाणे साधारण एकुण 36 पात्र व्हिडीओ एका विभागीस्‍तरावर प्राप्‍त होतील.

ज्‍यामधुन परीक्षकाकडुन छाननी करून त्‍यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे 03 क्रमांक, माविमेतर महिलांचे 03 क्रमांक, काढुन 06 व्हिडीओ मुख्‍यालयाकडे पाठविले जातील. 06 विभागांचे मिळून 36 पात्र व्हिडीओ यामधुन राज्‍यस्‍तरीय विजेत्‍या 06 महिलांचा सन्‍मानचिन्‍ह, प्रमाणपत्र आणि राज्‍यस्‍तरीय महिला साहित्‍य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठी संधी देण्‍यात येईल. याशिवाय प्रत्‍येक सहभागी स्‍पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्‍यात येईल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24