अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे दूध संघ असून स्वतःचे फायदे व्हावेत, दूध संघाला नफा मिळावा आणि अनुदान देण्यापेक्षा अनुदान लाटण्याचे काम मंत्री करत असल्याचा आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे दुध दरवाढीसाठी आसूड आंदोलन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ,
राजेंद्र पिपाडा, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, बाजार समिती उपसभापती वाल्मीक गोर्डे, पंचायत समिती उपसभापती ओमेश जपे, भाजपाचे सचिन तांबे, नंदकुमार जेजूरकर आदी उपस्थीत होते.
सरकारने दुधाला ३० रुपये भाव द्यावा व १० रुपये अनुदान तात्काळ जमा करावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता शहरात नगर मनमाड महामार्गावर आंदोलन केले.
यावेळी सरकारला जाग आणण्यासाठी आसूड आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरून जाणारा दुधाचा टँकर रोखून धरत सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यापूर्वीच्या सरकारने जाहीर केलेलं ५ रुपये अनुदान गेले कुठे असा सवाल विखे यांनी विचारला असून दुग्धविकास मंत्र्यांसह आघाडीच्या नेत्यांनी अनुदान लाटल्याचा आरोप विखे यांनी केला आहे.
तसेच लवकरच हा घोटाळा बाहेर काढणार असून राज्यपालांची भेट घेणार असल्याच विखे यांनी सांगितले आहे. राहाता शहरात विखे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com