अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : शेवगाव तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० अखेरीस संपत आहे. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून लवकरच संबधीत ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे.
यामुळे भावी सरपंच होऊ पाहणाऱ्या अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. मागील काही वर्षापासून शासनाने ग्रामपंचायतीला खर्च करण्याचे अतिरिक्त अधिकार दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी स्पर्धा बघायला मिळते.
पूर्वी निधी खर्चाचा अधिकार फारसा नसल्याने बहुतांश ग्रापपंचायतींमध्ये बिनविरोध सदस्य निवडून दिले जात होते. मात्र मागील काही वर्षामध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत आहे.
सरपंचांना मिळालेले वाढीव अधिकारामुळे गावपातळीवर स्पर्धा निर्माण झाली आहे. बोधेगाव परिसरातील चापडगाव, हातगाव, पिंगेबाडी, शिंगोरी, सुकळी, गायकवाड जळगाव, ठाकूर पिंपळगाव, गदेवाडी, राणेगाव आदिसह तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० अखेरीस संपत आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर कोरोनामुळे निर्बंध आल्याने सरपंच पदासाठी तयारी करणार्यांची मोठी पंचाईत झाली आहे. सध्यातरी या निवडणुका वेळेतच होतील, अशी चिन्हे दिसत नाहीत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews